IPL 2018: चेन्नईविरुद्ध दिल्ली , कोण मारणार बाजी ?

टीम महाराष्ट्र देशा- बाद फेरीत पोहोचलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध होणारा सामना हा अधिकाधिक प्रयोग करीत आपली कामगिरी उंचावण्याची संधी राहणार आहे. इंडियन प्रीमिअर लीगमधील या सामन्याच्या निकालाने बाद फेरीवर कोणताही परिणाम होणार नाही.

आयपीएलच्या गुणतालिकेत पुन्हा एकदा तळाच्या स्थानावर राहण्याच्या स्थितीत असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला शुक्रवारी ‘प्ले आॅफ’साठी पात्र ठरलेल्या चेन्नई सुपरकिंग्सवर विजय नोंदविण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल. सुपरकिंग्स १२ सामन्यात आठ विजयांसह १६ गुणांची कमाई करीत द्वितीय स्थानावर आहे. दिल्ली संघ १२ सामन्यात केवळ तीन विजयासंह सहा गुण घेत अखेरच्या स्थानावर आहे. अखेरचे दोन्ही सामने जिंकले तरी दिल्ली संघ तळाच्याच स्थानावर राहील, हे निश्चित. दिल्ली संघ याआधी २०११, २०१३ आणि २०१४ साली देखील अखेरच्याच स्थानावर होता.

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.,थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस

You might also like
Comments
Loading...