चोरट्यांनी केला मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर हात साफ

arvind kejariwal

नवी दिल्ली : नेहमी प्रसिद्धीच्या झोतात असणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या थोड्याशा वेगळ्या कारणामुळे सध्या चर्चेत आहेत.दस्तुरखुद्द अरविंद केजरीवाल यांची निळ्या रंगाची व्हॅगन-आर कार सचिवालयासमोरुन चोरीला गेल्याची धक्कादायक घटनासमोर आली आहे. मुख्यमंत्र्यांचीच कार चोरीला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना ही कार चोरीला गेल्याने हा दिल्ली पोलिसांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे.दिल्ली पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्यामुळे केंद्राचं ‘ध्यान कुठे आहे?’ हे ट्वीट केजरीवालांनी रीट्वीट केलं आहे.आता दिल्ली पोलीस या प्रकरणाचा कसा छडा लावतात?तसेच या प्रकारणाचं राजकारण होतंय का ? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे .