अरविंद केजरीवालांच्या बंगल्यामध्ये मुख्य सचिवांना मारहाण ?

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीच्या मुख्य सचिवांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या दोन आमदारांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप मुख्य सचिवांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर केला आहे. सीएनएन न्यूज १८ वाहिनीने हे वृत्त दिले आहे. सोमवारी रात्री आपण बैठकीसाठी केजरीवालांच्या निवासस्थानी गेलो असताना ही घटना घडल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले.

मुख्य सचिवांनी या प्रकरणी दिल्लीच्या नायाब राज्यपालांची भेट घेऊन तक्रार केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयाने मुख्य सचिवांचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

You might also like
Comments
Loading...