राजीव गांधी यांचा भारतरत्न काढून घ्यावा ; दिल्ली विधानसभेत प्रस्ताव मंजूर

टीम महाराष्ट्र देशा : भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्यात यावा, असा प्रस्ताव दिल्लीच्या विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राजीव गांधी यांना भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. मात्र राजीव गांधी हे शीख दंगलीतील दोषी असल्याचा आरोप आप सरकारने केला आहे.

गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा कारण 1984 मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते असा आरोप आप सरकारने केला आहे. याच आरोपामुळे आपने राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दरम्यान हा प्रस्ताव व्यक्तिगत पातळीवर सदनात ठेवला गेला असून अजून यावर कुठलाही निर्णय झाला नसल्याचे आपचे प्रवक्ते आणि आमदार सौरभ भारद्वाज यांनी सांगितले आहे.

You might also like
Comments
Loading...