बनावट पी.आर कार्डमुळे तुळजापूरातील विकास कामांचा बोजवारा

तुळजापूर- तालुक्यात बनावट पी.आर कार्डांनी धुमाकुळ घातल्याने तिर्थक्षेञ तुळजापूर शहरासह अनेक गावातील विकास कामांचा बोजावरा उडाला असुन या बनावट पी आर कार्डाचा मास्टर माईड कोण आहे. या पी.आर कार्डाचा शोध घेवुन बनावट कार्ड देणारे व घेणा-यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

तुळजापूर येथील सिटी सर्ह आँफिस मधुन मागील दहा वर्षापासून बनावाट पी.आर कार्ड सर्रास पणे कार्यालयातुन वितरीत केले गेल्याचे वृत्त आहे सध्या जुनेच पी आर कार्ड व टोच नकाशाचे झेरॉक्स मागवून त्या पाहुनच त्याआधारे पी.आर कार्ड टोच नकाशे सर्रास दिले जात असल्याचे आरोप नागरिकांमधुन केले जात आहेत. यामुळे तिर्थक्षेञ तुळजापूर विकास प्राधिकरणाचा रस्ता रुंदी करणासह अनेक कामांचा बोजवारा उडुन शासनाचे कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत. तुळजापूर येथे खरे पी.आर कार्ड बनविण्यास अधिकारी वर्गास वेळ नाही. बनावट पी.आर कार्ड दाखल करणाऱ्यांवर अधिकारी कुठलीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे शासनाची विविध विकास कामे चुकीच्या जागेवर होवून ती निष्काम ठरले आहेत .व वादावाद कोर्टकच-या वाढल्या आहेत.

तुळजापूर येथील पीआर कार्डची सत्यता तपासली तर अनेक शासकीय मोक्याच्या जागा मोठ्या प्रमाणात हडपल्या गेल्याचे दिसुन येत आहे. माञ संबंधित अधिकारी पीआर कार्ड सत्यता तपासत नाहीत. कारण यामधील अर्थपुर्ण संबधामुळे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच यात सतत चालढकल करीत असल्याने बनावट पीआर कार्ड माध्यमातून अधिकारी मालामाल झाले आहेत.

या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी विकास कामांसाठी अधिग्रहीत केलेल्या पीआर कार्डची सत्यता तपासण्याची मागणी होत आहे .असे केले तर अनेक शासकीय मोक्याच्या जागा हडपल्याचे निर्दशनास येईल. अनेकांनी बनावट पीआर कार्ड माध्यमातून तुळजापूर विकास प्राधिकारातुन रस्ते रुंदीकरण कामात जागा गेलेल्या नसताना बनावट पीआर कार्ड टोच नकाशे सादर करुन त्या खाली लाखो रुपये शासनाकडून हडपल्याचे दिसुन येईल. पण याची तक्रार करुनही चौकशी करण्यासाठी अधिकारी अर्थपुर्ण लोभामुळे अनुउत्सुक दिसत आहेत.