गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण खात्यांमुळेचं ठाकरे सरकारच्या खातेवाटपाचे घोंगडे भिजत पडले ?

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन १२ दिवस झाले तरी अजून मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. तर शपथ दिलेल्या कॅबिनेट मंत्र्यांनाही अजून खाते वाटप केले नाही. त्यामुळे या ठाकरे सरकारचे चालले तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मात्र आता सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील चर्चे अभावीचं खातेवाटपाचं घोंगड भिजत पडले आहे, असे दिसून येत आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

महत्त्वाच्या खात्यांवरुन खातेवाटप अडल्याचं म्हटलं जात आहे. महाविकास आघाडीत गृह, नगरविकास आणि गृहनिर्माण या तीन खात्यांवरुन अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे खातेवाटप रखडले आहे. येत्या १६ तारखे पासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाला सुरवात होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे सांगितले जात होते. मात्र महाविकास आघाडीच्या केवळ चर्चाचं सुरु असल्यने अधिवेशानापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान रेंगाळलेल्या खातेवाटपावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, राज्यातील कारभार हा ढिला पडला आहे. सरकार स्थापन होऊनही खाते वाटप झाले नाही. नेमका उशीर कुठे होतोय. हे सामान्य माणसाला कळाले पाहिजे. सरकारने सामान्य नागरिकांना याबाबत माहिती दिली पाहिजे. मलाईदार खात्यांच्या वाटपात मतभेद होत असल्याने उशीर तर होत नाहीना ? असा सवाल अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या