नवी दिल्ली: तामिळनाडूच्या कुन्नूरमध्ये भारतीय लष्कराचं MI-17V5 हेलिकॉप्टर कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. अशा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबतच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh)आज संसदेत निवेदन देणार आहेत.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी,संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसेच उच्च अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे. दरम्यान आज संध्याकाळपर्यंत बिपीन रावत यांचे पार्थिव लष्करी विमानानं आणले जाणार आहे. तर उद्या सकाळी 11 ते दुपारी 2 पर्यंत दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
दरम्यान या विमान अपघाताने देशभर शोक व्यक्त करण्यात येत आहे. तर उत्तराखंडमध्ये 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी बिपीन रावत यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- केवळ लष्करच नव्हे, तर अवघा देश या धक्कादायक घटनेमुळे हादरला आहे- राज ठाकरे
- बिपीन रावत यांच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण देश विषण्ण झाला- मुख्यमंत्री ठाकरे
- बिपीन रावत यांची संरक्षण क्षेत्रातील सेवा कायम लक्षात राहील- शरद पवार
- ‘त्यांच्या निधनामुळे मला…’, बिपीन रावत यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
- …त्यांनी केलेली भारतमातेची सेवा राष्ट्र कायम स्मरणात ठेवेल- देवेंद्र फडणवीस