fbpx

वंचित बहुजन आघाडी राज्यात ४८ जागा जिंकू शकते – प्रकाश आंबेडकर

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीत राज्यात वंचित बहुजन आघाडीचा फॅक्टर मोठा परिणामकारी असल्याचे समोर आले आहे. मात्र विविध एक्झिट पोलमध्ये राज्यात एकाही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी होणार नसल्याचे अंदाज वर्तविण्यात आले आहे. असे असले तरी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मात्र आपण ४८ जागांवर विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास आहे.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी आपण ४८ जागांवर विजयी होऊ शकतो पण ईव्हीएम मशीन हॅक झाले नाही तर हा विजय शक्य असल्याचे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, लोकशाहीत निवडणुका येत राहतील. जय-पराजय होत राहतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता पक्षाचे कार्य सातत्याने सुरू ठेवावे, जनसामान्यांशी नाळ जोडून ठेवावी. असे निर्देश प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.