निवडणुकीतील पराभव भाजपच्या जिव्हारी, प्रदेशाध्यक्ष पदावरून ‘या’ दिग्गज नेत्याला हटवले

flage of bjp

नवी दिल्ली : दिल्लीचे खासदार आणि अभिनेता मनोज तिवारी यांना पक्षातच मोठा झटका बसला आहे. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनी मनोज तिवारी यांना पदावरून काढून आदेश गुप्ता यांची दिल्ली प्रदेशाध्यक्ष म्हणून बनवलं आहे.

या बरोबरच छत्तीसगडच्या प्रदेशाध्यक्षपदी विष्णुदेव साय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असं असले तरीही मनोज तिवारी यांची नेमकी कोणत्या कारणांमुळे उचलबांगडी करण्यात आली याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.

दरम्यान, भाजपने प्रतिष्ठेची बनवलेली दिल्ली विधानसभा निवडणूक २०२० अर्थात या वर्षी फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला एकूण ८ जागा मिळाल्या होत्या. पक्षाने ही निवड मनोज तिवारीच्या अध्यक्षतेखालीच लढवली होती.

कोण आहेत आदेश गुप्ता?
आदेश गुप्ता यांचे व्यापा-यांमध्ये चांगले संबंध आहेत. भाजप मूळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदेश गुप्ता यांचे नाव घोषित करण्यात आलं. गुप्ता एमसीडीमध्ये महापौर राहीले आहेत.मनोज तिवारी यांना पदावरून काढून आदेश गुप्ता यांची निवड झाली आहे. आदेश गुप्ता एक वर्ष अगोदर उत्तर एमसीडीचे महापौर होते. भाजपकडून व्यापाऱ्यांना खूष करण्यासाठी नवा चेहरा समोर आणला आहे. मनोज तिवारी यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं आहे.

केजरीवाल हे मानसिक संतुलन गमावून बसले आहेत – मनोज तिवारी

मार खाऊन याल तर पदावरून काढून टाकेल राज ठाकरेंचा विभागाध्यक्षांना सज्जड दम

पुन्हा सत्ता आल्यास भाजप देणार गरीबांना दोन रुपयात किलोभर गव्हाचे पीठ