fbpx

खैरेंचा पराभव जिव्हारी; उद्धव ठाकरे म्हणाले हा पराभव खैरेंचा नव्हे तर तर माझाच पराभव

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत यांना दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना येथे दिली.

सध्या राज्यात दुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा सर्वात जास्त फटका मराठवाड्याला बसत आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्तांसाठी शिवसेना सरसावली असून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज (रविवार) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिल्हय़ाच्या दौऱ्यावर येत आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी राळेगावच्या चारा छावणीला भेट दिली. त्यानंतर बोलताना ठाकरे म्हणाले,काही झालं तरी औरंगाबाद सोडणार नाही. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या यशाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. दिल्लीत मला जो काही मानसन्मान मिळत आहे, तो तुमच्यामुळेच मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.