fbpx

पद्मावतील दीपिकाच्या पोशाख बद्दल हे माहित आहे का ?

deepikas-coschume-for-padmavati-93-kilos

संजय लीला भंसाळी यांचे चित्रपट नेहमीच भव्य-दिव्य असतात. त्यांच्या चित्रपटाची नेहमीच चर्चा होते पण चित्रपटाबरोबरच भव्य दिव्य सेट, कलाकारांचे पोशाख याची देखील तितकीच चर्चा होते. नुकताच पद्मावतीचा ट्रेलर रिलीज झाला आणि त्याची देखील जबरदस्त चर्चा झाली. त्यातील दीपिका पादुकोणच्या लुकची सर्वाधिक चर्चा झाली.दीपिकाच्या पोशाखाचे वजन ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

‘पद्मावती’साठी दीपिकाला बरेच कष्ट करावे लागलेत. बरीच आव्हानं तिनं पेललीयत. तिच्या लूक्सचं सगळीकडे कौतुक होतंय, पण तिचा काॅस्च्युमच आहे 35 किलोंचा.
सिनेमात दीपिकाचा दुपट्टा आहे 4 किलोंचा, तर घागरा आहे 20 किलोंचा. इतक्या वजनदार पोशाखात तिनं शूट केलं. याशिवाय तिचा मेकअपही एकदम हेवी होता. आणि जवळ जवळ 11 किलो वजनाचे दागिने तिला घालायला लागलेत.
पूर्ण तयार झाल्यानंतर दीपिकाचं वजन 58 किलोंवरून पोचलं 93 किलोंवर.
संजय लीला भंसाळीनं पद्मावतीसाठी 400 किलोंचं सोनं वापरलंय. ते सोनं वितळवून पुन्हा नव्यानं डिझाईन केलं. त्यासाठी 200 कामगारांनी मिळून काम केलं. त्यालाही 600 दिवस लागले.
संजय लीला भंसाळीसाठी हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा या वर्षीचा सर्वात हिट ठरण्याची शक्यता आहे. सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होईल.