ऑस्कर’ला दीपिका राहणार गैरहजर

‘xXx: द रिटर्न ऑफ एक्सेंडर केज’ या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये झळकलेली अभिनेत्री दीपिका पदुकोणला ‘ऑस्कर’च्या रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळणार होती. ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात ती मिरवणार का असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता.
तेव्हा ती म्हणाली, आपण ऑस्कर पुरस्काराच्यावेळी हजर राहणार नाही. तिच्या चित्रपटांविषयी उठणाऱ्या अफवांविषयीसुद्धा ती स्पष्ट बोलली. ‘मी मिस्टर अॅण्ड मिसेस स्मिथ या चित्रपटात मी काम करत नाहीये. मी जर कोणत्या चित्रपटात काम करत असेन तर मी त्याबद्दल नक्कीच बोलेन’, असेही दीपिका म्हणाली.