#Chhapaak मधील दीपिकाचा फर्स्ट लुक

टीम महाराष्ट्र देशा : अँसिड हल्ल्यातील पिडीता लक्ष्मी अगरवाल हिच्या जीवनावर आधारित #Chhapaak (छपाक) या चित्रपटात लक्ष्मीची भूमिका दीपिका पादुकोण बजावणार आहे. नुकतेच तिने सोशल मिडियावर या चित्रपटातील ‘मालतीच्या’ भूमिकेतील तिचे फोटो शेअर केले आहेत.

या चित्रपटाच्या शूटींगला आजपासून सुरवात होत असल्याचे सांगत तिने तिच्या पात्रातील फोटो ट्वीटर अकाऊंटवरती शेअर केला आहे. या चित्रपटातील मालती चे पात्र आयुष्यभर माझ्या सोबत राहील असेही तिने म्हटले आहे. हा चित्रपट पुढीलवर्षी १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार या करत आहेत.

तिच्या या पोस्टवर अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिचे कौतुकही केले आहे. सध्या तिच्या या पोस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आहे तर  तिचे चाहते या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.