Share

Singham | ‘सिंघम 3’मध्ये दीपिका पादुकोण दिसणार ‘या’ भूमिकेत

Singham | मुंबई: बॉलीवूडचा ॲक्शन डिरेक्टर रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शक सिंघम (Singham) या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप पडली आहे. अशा परिस्थितीत चाहत्यांना या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरता लागली आहे. नुकताच रोहित शेट्टीने या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल खुलासा केला आहे. ‘सर्कल’ चित्रपटाच्या गाण्याच्या लॉन्चिंगदरम्यान रोहित ‘सिंघम अगेन’ (Singham Again) बाबत बोलला आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून यामध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukon) महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

‘सर्कल’च्या ‘करंट लगा’ या गाण्याच्या लॉन्चिंग कार्यक्रमांमध्ये रोहित शेट्टीसह बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील उपस्थित होते. दरम्यान, ‘सिंघम अगेन’मध्ये लेडीज सिंघमची भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न उपस्थित करत रोहितने स्वतः याचे उत्तर दिले आहे. रोहितचे हे उत्तर ऐकून चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल अधिकच उत्सुकता निर्माण झाली आहे.

यावेळी रोहित म्हणाला की,”लोकांना कुठून ना कुठून तरी ही माहिती मिळणारच होती. त्यापेक्षा मीच या चित्रपटातील अभिनेत्री बद्दल सांगून टाकतो. दरवेळी लोक मला विचारत असतात की लेडीज सिंघम कधी येणार? तर ‘सिंघम 3’ मध्ये लेडी सिंघम येणार असून, दीपिका पादुकोण ही भूमिका साकारणार करणार आहे.

याबद्दल पुढे बोलताना रोहित म्हणाला की,”दीपिका पदुकोण माझी लेडी कॉप आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये आम्ही सिंघम 3 या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहोत.” दरम्यान, रणवीर सिंग म्हणाला की,”सिंघम 3 माझ्याशिवाय बनू शकत नाही.” यावरून असे लक्षात येते की सिंघम 3 मध्ये रणवीर सिंग देखील दिसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

Singham | मुंबई: बॉलीवूडचा ॲक्शन डिरेक्टर रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शक सिंघम (Singham) या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप …

पुढे वाचा

Entertainment