महाराष्ट्र देशा डेस्क : बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या एका फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. त्याने नुकतेच एका मासिकाच्या मुखपृष्ठासाठी न्यूड फोटोशूट केले आहे. त्याच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटवर त्याचीच चर्चा सुरु आहे. या फोटोंमध्ये रणवीर विना कपड्यांचा कार्पेटवर वेगवेगळ्या स्टाइलमध्ये पोज देताना दिसत आहे. काही फोटोंमध्ये रणवीर झोपून पोज देत आहे, तर काही फोटोंमध्ये तो उभा राहून पोज देताना दिसत आहे. त्याच्या फोटोंवर अनेक मिम्स देखील बनवले जात आहेत. तर काही जण त्याची खिल्ली उडवताना दिसत आहेत. मात्र सर्वांनाच प्रतीक्षा होती ती रणवीरची पत्नी दीपिका पदुकोण हिच्या प्रतिक्रियेची आणि आता दीपिकाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रणवीरचे फोटोशूट पाहून दीपिका खूपच इम्प्रेस झाली होती. दीपिकाला या फोटोशूटबद्दल सर्व माहिती आधीच मिळाली होती. तसेच तिला या फोटोशूटची संकल्पना देखील आवडली होती. हे फोटो इंटरनेटवर पोस्ट करण्यापूर्वी दीपिकाला दाखवण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान दीपिकाने नेहमीच रणवीरला सपोर्ट केला आहे. रणवीरला नेहमीच काहीतरी वेगळं करायला आवडत. या सगळ्यात दीपिका त्याला पाठिंबा देते.
मिमी चक्रवर्ती संतापल्या
रणवीरच्या या फोटोशूटवर बंगाली अभिनेत्री आणि टीएमसीच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या कि, “रणवीरच्या या फोटोशूटने इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. यावर अनेक लोक कॉमेंट्समध्ये फायर इमोजी टाकत आहेत. पण हेच जर एखाद्या मुलीने केले असते तर लोकांनी तिची अशीच स्तुती केली असती का? तिचा अपमान केला असता आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या असत्या. आतापर्यंत तिचे घर देखील जाळून टाकले असते.”
महत्वाच्या बातम्या:
- Tirumala | “…तर गाडीतली शिवाजी महाराजांची मूर्ती काढा”; तिरुपती बालाजी परिसरातील खळबळजनक घटना । पहा VIDEO
- NCP on Deepak Kesarkar | दीपक केसरकरांनी इतरांवर टीका करताना स्वतःचे रक्त तपासावे ; राष्ट्रवादीची खोचक टीका
- Nitesh Rane : नारायण राणेंना शिवसेना सोडल्यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, नितेश राणेंचा मोठा खुलासा
- Abu Azami | देशात नग्न फोटो शेअर केलेले चालतात, मग हिजाबलाच बंदी का?- अबू आझमी
- Chandrakant Khaire | “आनंद दिघेंच्या आशीर्वादाने मोठे झाले, त्यांनाच विसरले” ; चंद्रकांत खैरेंची एकनाथ शिंदेंवर घणाघात
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<