दीपिका-रणवीर नोव्हेंबरमध्ये अडकणार विवाहबंधनात

वेबटीम – बॉलिवूडची हॉट जोडी रणवीर सिंग-दीपिका पदूकोण यांच्या लग्नाची तारीख उघड झाली आहे. रणवीर व दीपिका म्हणजेच चाहत्यांचे लाडके ‘रणदीप’ येत्या १९ नोव्हेंबरला लग्न करणार आहेत, अशी चर्चा आहे. या दोघांचे लग्न मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे.

सोनम कपूरच्या लग्नानंतर दीपिका व रणवीरचे आई-वडील एकमेकांना भेटले होते. त्यावेळी या दोघांच्या लग्नाची चर्चा देखील झाली. चर्चेनंतर दीपिकाची आई व बहिण दोघीही खरेदीसाठी परदेशात रवाना झाल्या होत्या. दीपिका रणवीरचे कुटुंबीय सध्या खरेदीत व्यस्त आहेत तर दीपिकाने देखील लग्नाच्या तयारीसाठी सध्या कोणताही चित्रपट न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.

कान चित्रपट महोत्सवात सोनम कपूर गेली असता तिथे आज तक वाहिनीने तिची खास मुलाखत घेतली. या मुलाखतीतच सोनमने रणवीर- दीपिकाच्या नात्यावर आणि त्यांच्या लग्नावर शिक्कामोर्तब केले. सोनम म्हणाली की, रणवीर आणि दीपिकाचे लवकरात लवकर लग्न व्हावे अशी इच्छा आहे. कपूर कुटुंबिय दीपिका आणि रणवीरच्या लग्नासाठी उत्सुक आहेत.’

गोलियों की रासलिला रामलीला सिनेमाच्या सेटवर हे दोघे पहिल्यांदा भेटले आणि त्यांच्यात मैत्री झाली. हळहूळ या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. रामलीलानंतर दोघांनी बाजीराव मस्तानी आणि पद्मावत सिनेमांत एकत्र काम केले.