​‘लेडी दबंग’ मुंबईच्या रस्त्यावर , दीपिका पादुकोणचा नवीन लूक

dipika padukon police look

टीम महाराष्ट्र देशा :  बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तिच्या नवीन लूक मुळे भलतीच चर्चेत आली आहे. एका जाहिरातीमध्ये ती लेडी दबंग बनून मुंबईच्या रस्त्यांवर  पोलिस आॅफिसरच्या लूकमध्ये फिरताना दिसली.  तिच्या या नव्या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे, हा नवा अवतार तिच्या आत्तापर्यंतच्या चित्रपटांपेक्षा अगदीच वेगळा आहे. यात दीपिका पोलिस इन्स्पेक्टरच्या वेषात दिसतेय.

Deepika Padukone new Look as Cop Viral in social mediaखाकी पॅन्ट, पांढरा शर्ट, डोळ्यांवर गॉगल आणि हाताला गुंडाळलेला लाल रंगाचा रूमाल अशा कडक लूक मध्ये  दीपिका चांगलीच ‘दबंग’ दिसतेय.

Deepika Padukone new Look as Cop Viral in social mediaदीपिका लग्न करणार अशी चर्चा होती. ५ जानेवारीला दीपिकाचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्याच दिवशी दीपिका व रणवीर सिंग एन्गेज्ड होणार, अशी बातमी आली होती. पण ही बातमी अफवाच ठरली. लवकरच दीपिका व रणवीर या दोघांचा ‘पद्मावत’ हा सिनेमा रिलीज होतो आहे.

Deepika Padukone new Look as Cop Viral in social media रिलीजआधी हा चित्रपट चांगलाच वादात सापडला आहे. या वादामुळे या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर पडली होती. अखेर सेन्सॉर बोर्डाने पाच दुरूस्त्या व नाव बदलण्याच्या अटीवर या चित्रपटाला हिरवी झेंडी दिली होती. त्यानुसार, येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.  दीपिकाने अद्याप कुठलाही सिनेमा साईन केलेला नाही. रणवीर  ‘गली बॉय’,‘सिम्बा’ या चित्रपटात बिझी आहे.

Deepika Padukone new Look as Cop Viral in social media

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर