फॉलोअर्सच्या जोरावर दीपिका पादुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

dipika

मुंबई : बॉलिवूडमधील ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या दीपिका पादुकोणने तिच्या अभिनयाच्या जोरावर भरपूर यश मिळवलं आहे. फक्त देशात नाही तर संपूर्ण जगात तिने एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. नुकतंच दीपिकाला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला होण्याचा सन्मान मिळाला आहे. चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून तिला गौरवण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारी दीपिका ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे.

दीपिकाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. यामुळे सर्वाधिक चाहतावर्ग असलेल्या सेलिब्रिटींच्या यादीत ती टॉप १०० मध्ये येते. सध्या दीपिकाचे इन्स्टाग्रमावर जवळपास ५९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. गुगलवरही ती नेहमीच मध्ये येते. सध्या दीपिकाचे इन्स्टाग्रमावर जवळपास ५९.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. तर गुगलवरही ती नेहमीच ट्रेडींगवर पाहायला मिळते. दीपिकाच्या सर्वाधिक चाहत्यावर्गामुळे तिला आशियातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून निवडण्यात आले आहे.

दीपिकाने सिनेसृष्टीत पाऊल ठेवून तिला तेरा वर्ष झाली आहेत. यादरम्यान तिने बॉलिवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्ये तिची वेगळी छाप पाडली आहे. दीपिका ही अनेक ब्रँडच्या जाहिरातीत काम करते. दरम्यान, दीपिका तनिष्क, ओपो,नेस्ले सारख्या बड्या ब्रॅण्डच्या जाहिरातींची ब्रँड अम्बेसेडर आहे. दरम्यान, दीपिका रणवीरसोबत ‘८३’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यानंतर दीपिका पठाण आणि फाइटर, द इंटर्न या चित्रपटामध्ये दिसणार आहे. चाहत्यांमध्ये तिच्या आगामी चित्रपटाची उत्सुकता नक्कीच आहे.

महत्वाच्या बातम्या :