अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज ३२ वा वाढदिवस

deepika birthday

टीम महाराष्ट्र देशा : अभिनेत्री दीपिका पादुकोण आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयात पदार्पणा करण्यापूर्वी दीपिका मॉडेलिंग क्षेत्रात अॅक्टिव्ह होती. दीपिकाने अनेक जाहिरातीत काम केले असून मॉडेलिंग करत असताना दीपिका किंगफिशर कॅलेंडर गर्लसुध्दा बनली होती. त्यानंतर दीपिकाच्या लोकप्रियतेत भर पडत गेली. आज दीपिकाची फॅनफॉलोइंग खूप आहे. परंतु तिच्या चाहत्यांना तिच्या खासगी आयुष्यातील काही रंजक गोष्टी अद्याप ठाऊक नसतील. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया रंजक गोष्टी…

दीपिका तिच्या एका चित्रपटासाठी 13 कोटी रुपये फीस घेते. तिने आतापर्यंत २० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने  2017 मध्ये ‘XXX: द जेंडर केज’ या हॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे.

Loading...

deepika xxx return xander cageदीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 रोजी डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात झाला. दीपिका बॅडमिंटन स्टार प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. दीपिकाची आई उजाला या ट्रॅवल एजंट आणि धाकटी बहीण अनिशा गोल्फर आहे.

Deepika-Padukone-childhood-pictures-3फिल्ममेकर फराह खानच्या ‘ओम शांति ओम'(2007) या सिनेमातून दीपिकाने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. दीपिकाचा ‘ऐश्वर्या’ हा कन्नड भाषेतील पहिला सिनेमा होता.

बंगळूरच्या सोफिया हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि माऊंट कार्मल कॉलेजमधून दीपिकाने प्री-यूनिव्हर्सिटी एज्युकेशन पूर्ण केले. त्यानंतर दीपिकाने  बीए (सोशिओलॉजीध्ये) करण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्ध्यावर सोडून ती मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. वयाच्या 8 व्या वर्षीच दीपिकाने अनेक जाहिरातींमध्ये काम केले आहे.

deepika-padukone-plastic-surgery-before-and-afterलहान असताना दीपिकाने लिरिल आणि क्लोज-अपसह अनेक ब्रॅण्ड्सच्या जाहिरातीत काम केले. हिमेश रेशमियाच्या ‘नाम है तेरा..’ या अल्बममध्ये सुद्धा दीपिका झळकली.

 ‘चांदणी चौक टू चायना’ या चित्रपटातील सर्व स्टंट दीपिकाने स्वतः केले होते. तिने बॉडी डबलचा वापर केला नव्हता.chandni chowk to china dipika stunt

दीपिकाच्या खासगी आयुष्यविषयी सांगायचे झाले तर, तिचे नाव अनेक लोकांसोबत जोडण्यात आले आहे. रणबीर कपूर, निहार पांड्या, सिध्दार्थ माल्या हे तिच्या लव्ह लिस्टमध्ये सामील आहे. आता ती रणवीर सिंहसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.dipaka love affairs

‘सावरिया’ चित्रपटासाठी आधी दिपिकाचा विचार झाला होता, मात्र भन्साळीने सोनम कपूरला निवडले. ‘सावरिया’ आणि दीपिकाचा ‘ओम शांती ओम’ एकाच दिवशी रिलीज झाला होता. यात ‘ओम शांती ओम’ हिट तर ‘सावरिया’ फ्लॉप झाला होता. ‘जब तक है जान’ आणि ‘धूम ३’ साठी दीपिकाची निवड करण्यात आली होती. मात्र तिने नकार दिल्यानंतर हे चित्रपट कतरिनाला मिळाले. दीपिकाने सलमान खान सोबतचे ‘सुल्तान’, ‘शुद्धी’ आणि ‘किक’ हे चित्रपट नाकारले आहेत.

salman and dipika movieदीपिकाला रिकाम्या वेळात घरी राहणे व घरातील कामे करायला आवडतात. हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंग टोरोंटोमध्ये करत असताना तिला चार महिने एकट रहावे लागले होते. त्यावेळी ती स्वताची सर्व कामे स्वतः करत होती. बाहेर जाताना दीपिका सेफ्टी पिन, सुई-धागा, हूक, नेल फायलर, बिस्कीट, मिंट आणि पर्फ्यूम नेहमी सोबत ठेवते.deepika-family

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फाॅलो करा टि्वटर आणि जी प्लसवर 
Loading...
Loading...
Loading…
Top Posts

राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
दिल्ली निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांना मिळाले स्थान
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'