Deepali Sayed। मुंबई : आज उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात (सर्वोच्च न्यायालय) दाखल केलेल्या काही याचिकांवर सुनावणी पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी जोरदार युक्तिवाद केला. या प्रकरणी पुढील सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. तसेच हे प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. यांनतर याबाबत आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दीपाली सय्यद या गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आल्या आहेत. तसेच आजच्या कोर्टाच्या सुनावणीनंतर त्यांनी ट्विट करत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्विटमध्ये सय्यद म्हणाल्या कि, अजुनही वेळ गेलेली नाही, आमदार खासदारांना शिवसेना पक्ष मागायला कोर्टात जाण्याची गरज लागणार नाही. आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय शिंदे साहेबांनी चर्चा केली तर मार्ग निघेल. याची जबाबदारी दोन्ही बाजुने झाली तर विजय शिवसेनेचाच होईल. जय महाराष्ट्र, असं त्या म्हणाल्या.
दरम्यान, गटनेता पदावरुन शिवसेना आणि शिंदे गटात मोठा वाद सुरु आहे. आज कोर्टाने याबबात महत्वाचे निरीक्षण नोंदवले. गटनेता बदलणं हा पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे मत न्यायालयाने म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरेंनी पावलं उचलत शिंदे यांना गटनेतेपदावरून हटवले होते. तसेच त्या ठिकाणी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र एखाद्या गटाला आपला नेता बदलावा वाटत असेल तर त्यात गैर काय असा युक्तिवाद हरीश साळवे यांनी केला? मात्र कुठेतरी दूर बसून मी नेता आहे सांगणं हे कुठल्या तत्वात बसतं असा युक्तिवाद ठाकरेंची बाजू मांडणारे वकील कपिल सिब्बल यांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs WI : टीम इंडियाची वेस्ट इंडीजमध्ये एन्ट्री, कोच राहुल द्रविड यांचा दिसला खास लूक; पाहा VIDEO!
- Aditya Thackeray : घोटाळे, लफडी करायची तुम्ही आणि हे लपवायला पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसायचा; आदित्य ठाकरे आक्रमक
- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | प्रकरण मोठ्या खंडपीठात जाण्याची शक्यता, पुढील सुनावणी १ ऑगस्टला
- IND vs WI : वेस्ट इंडीज दौऱ्यात भारतीय संघाला करावा लागणार ‘या’ संकटांचा सामना; वाचा सविस्तर…!
- Shinde Vs Thackeray : “…तर हायकोर्टात का गेला नाहीत”, सरन्यायाधीशांचा शिंदे गटाला सवाल
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<