Deepali Sayed । मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ माजला आहे. शिवसेनेत असलेले एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड केला. सेनेच्या ४० आमदारांसह शिंदेनी भाजपच्या सहकार्याने राज्यात सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे शिंदे गटात असलेले आमदार जल्लोष करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बॅनर लावून शुभेच्छा देण्यात येत आहेत. मात्र या बॅनरवर उद्धव ठाकरेंना स्थान नाही. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दीघे यांचे फोटो बॅनरवर लावले जात आहे. त्यामुळे शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी शिवसैनिकांना सवाल केला आहे.
दीपाली सय्यद म्हणाल्या, “शिवसेनेच्या आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही. मातोश्रीच्या वाटेला आदरणीय शिंदे साहेबांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाहीत. तुम्ही शिवसैनिक मग मातोश्रीला विसरून कामकाज करणार का? मातोश्रीच्या बैठकीला शहा-फडणवीसांनी येण्याची वाट बघणार का?”
दीपाली सय्यद यांनी यापूर्वी देखील बंडखोर शिवसेना आमदारांना आवाहन केले होते. दिपाली सय्यद म्हणाल्या, “आदरणीय उद्धवसाहेबांनी आमदारांसाठी मातोश्रीचे दरवाजे नेहमीच उघडे ठेवले असून शिंदे साहेबांच्यावतीने प्रवक्ते व आमदारांनी उद्धव साहेबांशी चर्चा करण्याची विनंती केली आहे. ही सर्व घटना शिवसेनेचा भाजपावर असलेल्या हिंदुत्वाच्या विश्वासामुळे घडली असून भाजपने मोठ्या मनाने मध्यस्थी करावी.”
दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. “शिवसेना तोडून लढण्यापेक्षा जोडून लढली तर शिवसैनिकाला आनंद आहे. आदरणीय उद्धव साहेब व शिंदेसाहेब यांना एकत्र करण्यासाठी शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी व पक्षा बाहेरून नरेंद्र मोदी साहेबांनी मध्यस्थी करावी, मोदी साहेबांचा शब्द उद्धव साहेब व शिंदे साहेब टाळणार नाहीत हिच एक आशा आहे”, असे ट्विट दिपाली सय्यद यांनी केले होते.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<