मुंबई: राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. या सर्व सत्तानाट्यावर अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली आहे. यावरच आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी नवनीत राणांवर (Navneet Rana) निशाणा साधला आहे.
“राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा ही शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील, आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतुन सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे…”, असे ट्वीट दिपाली सय्यद यांनी केले आहे.
राणा बाईला शिवसेना नावाचा रोग झाला आहे. राष्ट्रपती राजवट लावण्याची घाई झाली आहे. बाई थोडी कळ काढा हि शिवसेनेची शाळा आहे, सुट्टीवर गेलेली पोर परत येतील आल्यानंतर पहिले तुमचा अमरावतीतुन सुफडा साफ करतील. बोगस कागदपत्रे… @AmitShah @BJP4Maharashtra @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) June 26, 2022
दरम्यान राज्यातील सत्तानाट्यावर नवनीत राणा म्हणाल्या, “बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांना केंद्राची सुरक्षा द्यायला हवी. राज्यातील संघर्ष पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा”. मात्र राज्यातील कोणत्याही आमदाराचे संरक्षण काढण्याचे आदेश मुख्यमंत्री वा गृहविभागाने दिलेले नाहीत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या:
- Aditya Thackeray : “विधानसभेचा रस्ता वरळी आणि भायखळ्यातून जातो…”, आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना इशारा
- Sanjay Raut : “बंडखोरांना अनेक बाप, आमचा एकच बाळासाहेब ठाकरे…!” ; संजय राऊत यांचा हल्लाबोल
- IND vs ENG : भारताच्या खेळाडूशी गैरवर्तन करणाऱ्याला विराटनं केलं ‘गप्प’; स्टेडियममधील VIDEO झाला व्हायरल!
- Sanjay Raut : “…मग महाराष्ट्रात मशान आहे काय?”, संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला
- IND vs ENG : विराट कोहली पुन्हा होणार भारताचा कर्णधार?
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<