Share

Deepali Sayyad | शिंदे गटात जाणार का? दिपाली सय्यद यांनी केलं स्पष्ट, म्हणाल्या…

 Deepali Sayyad | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेत भाजपसोबत (BJP) युती करून, राज्यामध्ये सरकार स्थापन केलं. या सगळ्यामुळे शिवसेना पक्ष संपूर्णपणे कोलमडून गेला. त्याचबरोबर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे आता केवळ हातावर मोजता येतील इतकेच नेते राहिले आहेत. त्यामध्ये दिपाली सय्यद देखील ठाकरे गटात नाराज असल्याचं बोललं जात असून, त्याही आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) गटात जाणार का ?, असे सवाल केले जात केलात. याच पार्श्वभूमीवर दिपाली सय्यद (Deepali Sayyad) यांनी भाष्य केलं आहे.

काय म्हणाल्या दिपाली सय्यद (Deepali Sayyad)

दिपाली सय्यद यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. काही गोष्टींसाठी नियोजन आखावे लागते. त्याला वेळ द्यावा लागतो. या गोष्टी कृतीतूनच लोकांपर्यंत पोहोचू शकतात. मागील काही दिवसांपासून मी त्याच कामात होते. लवकरच ते लोकांपर्यंत पोहोचेल. प्रत्येकजण आपापले काम करतो. माझी कोणावरही नाराजी नाही. प्रत्येकजण आपली जागा स्वत:च्या कर्तृत्वाने मिळवत असतो. त्यामुळे मी नाराज नाही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

मी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र मोठ्या नेत्यांच्या मनात काय असेल, हे आपण सांगू शकत नाही. हे दोन्ही नेते एकत्र यावेत अशी माझी इच्छा होती. भविष्यातही त्यांनी एकत्र यावे, असे मला वाटते, असेही दीपाली सय्यद यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या दौऱ्याला यश मिळो. माझ्या शुभेच्छा असतील. त्यांनी अगोदरच या दौऱ्यांना सुरुवात करायला हवी होती. माझे पदाधिकारी किती मजबूत आहेत, हे नेत्याने तपासले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी हे केले असते, तर शिवसेना पक्षात फूट पडली नसती.

तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, माझा आवाज मातोश्रीपर्यंत जाण्यापासून रोखणारे बरेच लोक होते. आगामी काळात नक्कीच त्यांची नावे सांगेन. काही काम करायचे असेल तर आता आम्ही थेट मुख्यमंत्र्यांना भेटतो. आम्ही ते काम मुख्यमंत्र्यांना सांगतो. त्याची पुढे अंमलबजावणीही होते. ते खूप महत्त्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या :

 Deepali Sayyad | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी काही आमदार आणि खासदार आपल्यासोबत घेत भाजपसोबत (BJP) युती करून, राज्यामध्ये सरकार …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now