मुंबई : मागील काही दिवसांपासून भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सामनेही बघायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. तसेच राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात असल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना दिपाली सय्यद म्हणाल्या की,‘महागाई सारखे अनेक विषय असताना ते सोडून राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी तुम्ही जातीपातीच युद्ध करत आहात. त्यात लोकांना अडकवून हरवून ठेवलं जात आहे.’ तसेच देवाला आपण आज राजकारणातला एक मुद्दा बनवला असून हे राजकारण आहे का ? एकाठिकाणी भोंगा एका ठिकाणी हनुमान चालीसा हे सगळ पाहून वाईट वाटत, असेही सय्यद म्हणाल्या.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘राज्यात सर्वकाही बरखास्त होऊन राष्ट्रपती राजवट लागावी यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत. ही राष्ट्रपती राजवट लागू व्हावी म्हणून कुठल्याही पातळीला जाऊन अशा प्रकारच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’
महत्वाच्या बातम्या:
- “आदित्यजी ‘या’ घटना घडल्या तेव्हा तुम्ही रांगत होता”, केशव उपाध्येंचा टोला
- “भंडारी यांचे ‘ते’ वक्तव्य फडणवीसांवर अन्याय करणारे”, संजय राऊतांचा टोला
- “निकले हैं वो लोग हमारी शख्सियत बिगाड़ने…”, संजय राऊतांनी ट्वीट करत साधला निशाणा
- “…तर प्रेतं तरी बघायला येतील का?”, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
- “मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केलेल्या शिवसेनेला…”, बाबरी वादावरून केशव उपाध्येंचा टोला