मुंबई : सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांनतर शिवसेना नेते आणि शिंदे गटातील नेते यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले. मात्र शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी शिंदे गटाने शिवसेनेत परत यावे अशा आशयाचे ट्विट केले होते. त्यावरून बरीच चर्चा सुरु आहे. यावरूनच आता दीपाली सय्यद यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली आहे.
परिषदेत बोलताना सय्यद म्हणाल्या कि, “माझ्या मनातील इच्छा मी ट्विटद्वारे व्यक्त केली होती. शिवसेनेत पडलेले दोन गट मला नको आहेत. मला शिवसेना एक झालेली हवी आहे, त्यासाठी मी मध्यस्थी करते. गेल्या काही दिवसात मी काही लोकांशी भेटी गाठी घेतल्या त्यावरून मला असं जाणवला आहे कि, शिवसेनेतील दोन्ही गटांना पुन्हा एकत्र यायचं आहे, पण कुठेतरी मान, अपमान, अहंकार या गोष्टी मध्ये येत आहेत.” तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यावा, अशी इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सय्यद यांनी केलेले ट्विट
“लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे, शिवसेनेच्या ५० आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे, त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील”, असे ट्विट दीपाली सय्यद यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Deepali Sayed : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची येत्या दोन दिवसात भेट होणार; दीपाली सय्यदांचा मोठा दावा
- PV Sindhu : शाब्बास पीव्ही सिंधू! पटकावलं सिंगापूर ओपन २०२२ मध्ये विजेतेपद
- Mahesh Tapase | मुख्यमंत्र्यांनी जाणून – बुजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा निधी थांबवला – महेश तपासे
- CM Eknath Shinde : बाळासाहेब ठाकरेंच्या नावे असणारी ‘ती’ योजना कार्यान्वित करणार; शिंदे सरकारचा निर्णय
- Deepali Sayed : संजय राऊत, शांतता घ्या, ठाकरे-शिंदेंना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घ्या; दिपाली सय्यद यांचा सल्ला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<