दीपक साळुंखे पाटलांना ऑडिओ क्लिप भोवणार, स्पष्टीकरण देण्यासाठी २ दिवसांचा अल्टीमेट्म

टीम महाराष्ट्र देशा- सोलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची एक वादग्रस्त ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिप मध्ये त्यांनी अर्वाच्च भाषेत शिव्या दिल्या असल्याचं समोर आलं आहे. आता या प्रकरणात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेतेमंडळी लक्ष घालू लागले असून दोन दिवसात साळुंखे यांना स्पष्टीकरण देण्याविषयी सांगण्यात आलं असल्याची माहिती आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने साळुंखे पाटलांना फोन करुन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केव्हा करणार याबाबत विचारणा केली असता, त्यांनी पक्षातील महिला पदाधिकारी आणि सोलापुरातील ज्येष्ठ नेत्यांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोग केला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासंदर्भात आज खा.सुळे यांना पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना सुळे यांनी हे प्रकरण पक्षाने अतिशय गांभीर्याने घेतलं असल्याचं म्हटलं आहे तसेच केवळ महिला पदाधिकारी नव्हे तर कोणत्याही महिलेचा अश्या पद्धतीने अपमान केला गेला असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी मी स्वतः बोलले असून दीपक साळुंखे पाटील यांना दोन दिवसात स्पष्टीकरण देण्यास सांगितले असल्याचं त्यांनी सांगितले.

Loading...

दरम्यान,प्रकरण अंगाशी येऊ लागताच दीपक साळुंखे पाटील यांनी ऑडिओ क्लिप मधील आवाज आपला नाही असा दावा केला आहे . हे तर आपल्याला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी लिगल सेलचे अध्यक्ष लवकरच पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. कायदेशीर सल्ला घेवून पुढील कारवाई करणार असल्याचा खुलासा  साळुंखे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला.

मोतीराम चव्हाण आणि दीपक आबा यांच्यातील मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून या क्लिपमध्ये दीपकआबा अक्कलकोट महिला तालुका अध्यक्षांविषयी शिवराळ भाषेत बोलत असल्याचे ऐकायला येते.

नेमकं काय म्हटलं आहे या ऑडिओ क्लिप मध्ये ?

“शरद पवार आहेत तो पर्यत माझं कोणी सुद्धा वाकडं करू शकत नाहीत. त्या ‘बाई’ला ****आला असेल तर दे म्हणावं राजीनामा, **** कार्यकर्त्यांना मी भीक घालत नाही. कोणत्या **** राजीनामा द्यायचा आहे त्यांनी खुशाल द्यावा. मोहिते पाटलांचे चमचे, **** लोकांनी आपल्याला पक्ष निष्ठा शिकवू नये”… अशा प्रकारचे बेताल आणि शिवराळ संभाषण या ऑडियो क्लिपमध्ये आहे. त्यामुळे पक्षाच्या महिला व इतर पदाधिकाऱ्याबाबत अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्या साळुंखे पाटलावर पक्षांचे ज्येष्ठ नेते काय कारवाई करतात, की त्यांना पाठीशी घालतात याकडे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

संतापजनक : राष्ट्रवादीच्या मुजोर माजी आमदाराची महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ, ऑडियो क्लिप व्हायरल

मराठा आरक्षण : नितेश राणेंनी पुरावे असतील तर सादर करावेत : आबासाहेब पाटील

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
बाळासाहेब थोरातांचा स्वबळाचा नारा
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
कोकणातलं राजकारण पेटलं;नाईक - राणे भिडले
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध, अन्न आणि औषध प्रशासनाचा दणका