एशियाड स्पर्धेत नेमबाज दीपक कुमारला रौप्य पदक

टीम महाराष्ट्र देशा : 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताकडून जोरदार कामगिरी सुरू आहे. नेमबाजीत 10 मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत अपूर्वी चंदेला-रवी कुमार या जोडीने कास्यपदक पटकावले. तर आज नेमबाज दीपक कुमार यानं 10 मी. एअर रायफल प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. त्याच्या या यशामुळे भारताच्या खिशात आणखी एक पदकाची वाढ झाली आहे.

सुशील कुमार कडून अपेक्षाभंग झाल्यावर त्याच दिवशी झुंजार मल्ल आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बजरंग पुनियाने गाजवला. आणि 18व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी त्याने 65 किलो गटातील चुरशीच्या किताबी लढतीत जपानच्या ताकातानी दाईचि याचा 11-8 गुणफरकाने पराभव करून भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.

मराठा मोर्चाचा पुन्हा एल्गार, आजपासून पुण्यात बेमुदत आंदोलन