मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेची सूत्र हाती घेतली आहेत. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राने राज्यात मोठा सत्तासंघर्ष पाहिला. शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे पालटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. हे सर्व ३९ आमदार आणि अपक्ष ११ आमदार सोबत घेऊन शिंदे महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडले. यानंतर ठाकरे सरकार कोसळले. भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मोठा इशारा दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना दीपक केसरकर म्हणाले कि, ज्या प्रकारची नोटीस एकनाथ शिंदे यांना सेनेकडून पाठवली त्या संदर्भात आम्ही सेनेला रीतसर पत्र पाठवू. जर त्यांनी कारवाई मागे घेतली नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन कारवाईचा प्रयत्न करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. नेते पदावरून शिंदे यांना हटवले जातय हे लोकशाहीला शोभा देत नाही. सेनेच्या पक्षात असताना तुम्ही अफिडेबिट करून घेताय ? त्यांना दुसऱ्या पक्षात जायचा अधिकार असतो. असे देखील केसरकर म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष पूर्णपणे विखुरला गेला आहे. उद्धव ठाकरे यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घ्यावे, असं शिवसेनेच्या खासदारांना वाटत आहे. तशी मागणी या खासदारांनी उद्धव ठाकरे यांना बोलून दाखवल्याचं सांगितलं जात आहे. तसेच सेनेचे 14 खासदार वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपच्या एका नेत्याने केला आहे. यानंतर आता खासदार देखील शिंदेंना पाठींबा देणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<