Deepak Kesarkar | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपची शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरुन राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या जनतेची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे कळवली आहे. झालेलं वक्तव्य मागे घेण्याबाबतच्या बाबतचं विधान यायला हवं होतं. शिवाजी महाराजांचा अपमान ही भूमी सहन करू शकत नाही. पण केंद्र सरकार लवकरच याबाबतचा निर्णय घेईल, असं दीपक केसरकर म्हणाले.
तसेच, जे लोक ठाकरेगटात राहिले आहेत त्यांना लवकरच कळेल आपली चूक झाली आहे. शिवसेना संपवायच्या कटकारस्थानाला उद्धव ठाकरे बळी पडले. आम्ही जनतेशी वफादार आहोत, तुम्ही मला काय म्हणता याकडे आम्ही लक्ष देत नाही. मागे राहिलेले लोक लवकरच चूक सुधारतील अशी अपेक्षा आहे आम्ही त्यांची वाट पाहतोय, असं देखील केसरकर म्हणाले.
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट शिवरायांशी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :
- Udayanraje Bhosale | अखेर राज्यपालांच्या विधानाची चौकशी होणार? उदयनराजे यांच्या ‘त्या’ पत्राची राष्ट्रपतींनी घेतली दखल
- Hemant Godse | संजय राऊतांची टीका हेमंत गोडसेंच्या जिव्हारी लागली, म्हणाले…
- Chitra Wagh | “उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदाची हौस फिटली”, चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
- Shahajibapu Patil | …तर बेळगावात घुसून महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करू – शहाजी बापू पाटील
- Uddhav Thackeray | “बेळगावसाठी नवस करायला मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत?”, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना सवाल
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले