Share

Deepak Kesarkar | अब्दुल सत्तार यांनी माफी मागितलेली असल्याने हा विषय संपला आहे – दिपक केसरकर

Deepak Kesarkar | मुंबई :  शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सत्तारांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. यावर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाष्य केलं आहे.

अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी संयम पाळण्याचा सल्ला दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी माफी मागितलेली असल्याने हा विषय संपला असल्याचं केसरकर म्हणालेत. ते म्हणाले, माफीनंतर असता हा विषय संपलाय. त्यामुळे याप्रकरणी मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.

दरम्यान , राष्ट्रवादीकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यावर केसरकर म्हणतात, “राजीनामा मागण्याचा त्यांना अधिकार आहे का? देशद्रोहाचे आरोप आणि तुरुगांत असणाऱ्यांचे राजीनामे राष्ट्रवादीने दिले नाहीत. एखाद्या वक्तव्यावरून राजीनामा मागतात हे कितपत योग्य आहे. तुम्ही निषेध करा, माफी मागण्याची मागणी करा. त्यांच्याकडून चुकीचे वक्तव्य झालं असेल, तर माफी मागण्यात काही गैर नाही,” असेही दीपक केसकर (Deepak Kesarkar) यावेळी बोलताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कोणीही वाईट अथवा व्यक्तिगत बोलू नये. शिंदे गटाच्या वतीने सुप्रिया सुळे यांची दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांना समज देतील. कोणत्याही महिलेचा अपमान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे,” असे दीपक केसरकर यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या :

Deepak Kesarkar | मुंबई :  शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics