Deepak Kesarkar । मुंबई: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल १०० दिवसांनंतर जामीन मिळाला आहे, अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या समर्थकांकडून जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. यादरम्यान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांच्यावर आमचा कुठलाही वैयक्तिक राग नसल्याचं सांगत त्यांना जामीन मिळाल्याच्या निर्णयाचं केसरकरांनी स्वागत केलं आहे. त्यांना चांगलं आरोग्य लाभो, त्यांच्याकडून चांगलं काम घडो, अशा सदिच्छा केसरकरांनी दिल्या आहेत. संजय राऊत जर चुकीचं बोलले असतील तर त्याला त्यापद्धतीने उत्तरं दिली जातात. ते चांगलं बोलले तर, त्याचं समर्थनही केलं जातं, असंही दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यावेळी बोलताना म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ज्यावेळी हे पथ्य पाळलं जातं, त्यावेळी व्यक्तिगत संबंधांमध्ये कुठेही दुरावा निर्माण होत नाही. त्यामुळे त्यांनी टीका केली तर त्यांच्या टीकेचं स्वागतच आहे. टीकेमुळे आपल्याला उत्तर देता येतात, आपला कारभार सुधारतो. पण टीका करत असताना योग्य त्या भाषेत टीका करावी, अशी अपेक्षा असते, हीच महाराष्ट्राची संस्कृती असल्याचं केसरकर म्हणालेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे एक ट्विट ठाकरे गटातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच व्हायरल होत आहे. रोहित पवार यांनी वाघाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. संजय राऊत हा असाच एक वाघ आहे. ते जुलूमशाहीपुढे झुकले नाहीत, ते लढले. शेवटी सत्याचाच विजय झाला. वाघ पिंजऱ्यातून बाहेर आला आहे, असे संकेत रोहित पवार यांनी दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | पिंजऱ्यातून वाघ बाहेर येतोय ; राऊतांच्या जामीनावर रोहित पवारांची प्रतिक्रिया
- Supriya Sule | “सत्यमेव जयते” ; संजय राऊत यांना जामीनानंतर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
- Dipali Sayyed | रश्मी ठाकरेंना ‘खोके’ येणं बंद झाल्याची खंत ; दिपाली सय्यद यांचा घणाघात
- Aditya Thackeray | शिंदे गट बैलांनाही नोटीस पाठवणार का – आदित्य ठाकरे
- Sanjay Raut | मोठी बातमी! राऊतांच्या जामीन स्थगितीची ईडीची मागणी न्यायालयाने फेटाळली