मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्याचे राजकारण संपूर्णपणे ढवळून निघाले आहे. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभरात उमठताना दिसत आहेत. राजस्थानी आणि गुजराती लोक महाराष्ट्रातून बाहेर काढल्यास महाराष्ट्रात पैसा उरणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वच पक्षांकडून टीका केली जात आहे. कोश्यारी हे या अगोदरही अनेक वेळा अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले होते. राज्यपालांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर भाजपच्या कोणत्याही नेत्यांकडून अजून प्रतिक्रिया आली नसली तरी दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. शिवसेनेकडून थेट एकनाथ शिंदे गटावर व मुख्यमंत्र्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे आता या मुद्द्यावर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री सध्या मुंबईत नाहीत, ते आल्यानंतर राज्यपाल यांच्या या वादग्रस्त वक्तव्याबाबत केंद्राशी बोलणार आहेत. त्यानंतर यापुढे राज्यपाल अशा प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य करणार नाहीत, अशी खात्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. मुंबईतील मराठी माणसाने प्रत्येक राज्यातील लोकांचा आदराने सन्मान केला आहे. अनेक क्षेत्रांमध्ये मराठी माणसाने आपला ठसा उमटवला आहे. मात्र व्यापारामध्ये मराठी माणूस टिकत नाही अशी वस्तुस्थिती आहे. असे सांगतानाच राज्यपाल हे घटनात्मक प्रमुख असल्याने त्यांनी अशी वादग्रस्त विधाने करू नयेत असे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्री मुंबईत आल्यावर याबाबत केंद्राशी चर्चा होईल यानंतर राज्यपाल अशा प्रकारची वादग्रस्त विधाने करणार नाहीत, अशी खात्री केली जाईल, असेही दीपक केसरकर म्हणाले.
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभरातून त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुरू झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी एकापाठोपाठ चार ट्विट करून राज्यपालांवर टीका केली. थोडक्यात काय तर महाराष्ट्र व मराठी माणूस भिकारडा आहे. १०५ मराठी हुतात्म्यांचा असा अपमान मोरारजी देसाई यांनी देखील केला नव्हता. मुख्यमंत्री शिंदे ऐकताय ना? की तुमचा महाराष्ट्र वेगळा आहे. स्वाभिमानाचा अंश उरला असेल तर आधी राज्यपालांचा राजीनामा मागा. दिल्ली पुढे किती झुकताय?, असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nitesh Rane | “…तेव्हा त्यांना मराठी माणूस आठवत नाही का?”; नितेश राणेंनी केलं राज्यपालांचं समर्थन
- Eknath Khadse | लवकरात लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे – एकनाथ खडसे
- Abdul Sattar । लवकरच शिवसेनेचे दहा आमदार शिंदे गटात येणार – अब्दुल सत्तार
- Supriya Sule : सुप्रिया सुळेंच चंद्रकांत पाटलांना खास आमंत्रण; म्हणाल्या,“लवकर घरी जेवायला या, खास बेत करते”
- Abdul Sattar | अर्जुन खोतकर आमच्या सोबत नक्की येणार; अब्दुल सत्तार यांचा मोठा दावा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<