Deepak Kesarkar | मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन गट पडले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) गट असा वाद नेहमीच दिसतो. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाहीत. शिंदे गटावर नेहमी गद्दार असल्याची टीका देखील केली जाते. ‘आले रे आले ५० खोके’. ‘५० खोके, एकदम ओके’, ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केले होते. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ‘५० खोके’ हा शब्द चांगलाच गाजला आहे. या पार्श्वभूमीवर ५० आमदार का फुटले, यावर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी खुलासा केला आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी शिंदे गटावर टीका केली होती. त्या टीकेला केसरकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार फुटले का?”, असा सवाल दीपक केसरकर यांनी केला आहे. दगडाला त्यावेळी पाझर फुटला असता तर सध्या भेटी जरी दिल्या असत्या, लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतली असती, लोकांना न्याय दिला असता, तर पक्षांमध्ये बंड का झालं असतं? असा खोचक टोला केसरकरांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे रविवारी औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. शेतकरी म्हणून एक व्हा. आसूड माझ्याकडे नाही, तुमच्याकडेच ठेवा. तो वापरा. शेतकऱ्यांच्याच हातात आसूड शोभून दिसतो. शेतीच्या अवजारांनी तुम्ही मातीलही कोंब फोडता मग सरकारला पाझर का नाही फोडू शकत. पाझरच नाही तर घाम फोडला पाहिजे,” अशा शब्दात ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकावर टीकास्त्र सोडले होते.
काय म्हणालेत दीपक केसरकर?
ते म्हणाले, “मुख्यमंत्री असताना यांनी किती लोकांना त्यांनी 50 हजार रुपये नुकसान भरपाई दिली हे जाहीर करावं. तुम्ही जेवढे दिले त्याच्या दुप्पट आम्ही कमी वेळात पैसे शेतकऱ्यांना दिले. तुम्ही फक्त बोलता आम्ही करून दाखवतो,” असा टोला केसरकरांनी ठाकरेंना लगावला. “निर्दयी सरकार कसं असतं हे यापूर्वीच्या सरकारकडे बघून लोकांना समजलं आहे. आयुष्यात यांनी कधीही पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना थेट दिले नाहीत,”असा आरोप केसरकर यांनी यावेळी केला.”अडीच वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या दारावर कधी जाऊ शकले नाहीत. मात्र आज शेतकऱ्यांच्या दारावर गेले याचा मला आनंद आहे. आम्ही उठाव केल्यानंतर यांना शेतकऱ्यांची आठवण झाली. ही खूप मोठी गोष्ट आहे. उद्धव ठाकरे यांना आज शेतकऱ्यांकडे जाण्याची संधी मिळाली ती सुद्धा आमच्यामुळेच मिळाली,” असं म्हणत केसरकरांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय.
महत्वाच्या बातम्या :
- Pravin Darekar | “तुम्ही भाजपमध्ये राहून विरोधकांसाठी काम करता, असं फडणवीस नेहमी म्हणतात”
- Eknath Shinde । “आम्हीही साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली”; एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
- Urfi Javed | टॉपलेस आवतारामध्ये उर्फी जावेद ने दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा
- Ketaki Chitale | “प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका”
- BJP | “घरात करमत नाही म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”; ‘या’ माजी मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर टीका