Share

Deepak Kesarkar | “फक्त लोकांना भडकवून सरकार चालवता येत नाही, त्यासाठी…”; दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

Deepak Kesarkar | सिंधुदुर्ग : राज्यातील राजकीय वातातरण गढूळ झालं आहेत. सतत आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरू असते. त्यातच परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला त्यावेळी त्यांनी सरकारवर टीका केल्या. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोला लगावला आहे.

काय म्हणाले दीपक केसरकर (Deepak Kesarkar)

आम्ही कुणावर टीका करत नाही. आमची दुःख आमच्या हृदयात आहेत. ती सांगून आम्हाला मतं मिळवायची नाहीत. आमच्या कामावर आम्हाला मतं मिळवायची आहेत. ते आम्ही करून दाखवू, असं म्हणत दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला केला आहे. आज केसरकर सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते बोलत होते. अडीच वर्ष तुम्हाला लोकांनी संधी दिली. आता अडीच वर्षात आम्ही काय करतो ते बघा आणि नंतर लोक काय म्हणतात ते ऐका. केवळ लोकांना भडकवल्याने सरकार चालत नसते, त्याने जनतेचे कल्याण होत नसते. त्यासाठी दिवसरात्र काम करावे लागते, असंही केसरकरांनी म्हटलं.

तसेच, शिवसेना पक्षातून आमदार आणि खासदार का बाहेर पडले या मागचे कारणही केसरकरांनी सांगितले आहे. पक्ष नेतृत्वावर बोलताना मनाला वेदना होत आहेत. पण दगडाला पाझर फुटला नाही म्हणूनच ५० आमदार फुटले हेच सत्य असल्याचे केसरकर यांनी म्हटले. उद्धव ठाकरेंना तेव्हा पाझर फुटला असता, शिवसैनिकांना साध्या भेटी दिल्या असत्या, जनतेची गाऱ्हाणी समजून घेतली असती तर पक्षामध्ये बंड का झालं असतं का ?.

तसेच, ज्यावेळी वीस आमदार आले आणि हे सर्व मिटवूया, सर्वांनी एकत्र येऊया असे सांगत असताना कोण सांगत होतं की तुम्हीही त्यांच्याबरोबर निघून जा ? त्यावेळी पाझर का नाही फुटला ? बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना कुठेतरी अडचणी येणार हे माहीत असूनही आमदारांना जा म्हणणं याला काय म्हणायचं?, असा सवालही दीपक केसरकरांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :

Deepak Kesarkar | सिंधुदुर्ग : राज्यातील राजकीय वातातरण गढूळ झालं आहेत. सतत आरोप-प्रत्यारोपांची खेळी सुरू असते. त्यातच परतीच्या पावसामुळे राज्यातील …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now