आपली तीन पिढ्यांची श्रीमंती ; हे हऱ्या नाऱ्या टोळीचे नेते

सावंतवाडी: आपली तीन पिढ्यांची श्रीमंती आहे. परंतु, नारायण राणे यांच्या आयुष्याची सुरुवात गँगस्टर म्हणून झाली. एका टोळीचा नेता, हऱ्या नाऱ्या गँग असलेल्या नारायण राणे व त्यांच्या मुलांवर खंडणी, मारहाण, पळवून नेण्याचे गुन्हे आहेत, अशी तोफ राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्यावर डागली आहे.

राणेंनी बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी विकासाबद्दल बोलावे. आपल्या विरोधात साधी एन.सीही नाही. राणेंबरोबर मुलांवरही जबरी गुन्हे आहेत. त्यांच्याविरोधात माझ्याकडे पुरावे आहेत. तसेच नारायण राणेंनी त्यांच्यावर असणाऱ्या गुन्ह्यांच्या प्रकरणांमुळेच पक्ष सोडल्याचा सणसणाटी आरोप सुद्धा केसरकर यांनी यावेळी केला.

दरम्यान, नारायण राणे यांनी दीपक केसरकर यांची स्मगलिंगचे प्रकरणं बाहेर काढू असा इशारा दिला होता. त्यानंतर दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर ही तोफ डागली आहे.