राणेंच्या पोटात का दुखते? : दीपक केसरकर

टीम महाराष्ट्र देशा- गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गमध्ये विमानसेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली होती. आज त्यानुसार 12 आसनी विमान बाप्पांसोबत उतरविण्यात आले. हे विमान चेन्नईहून आले होते. मात्र, यावरून सिंधुदुर्गात राजकीय वाद सुरु झाले आहेत.

दरम्यान, आज सिंधुदूर्गातील चिपी विमानतळावर चेन्नईहून उड्डाण केलेलं विमान सकाळी उतरलं होतं. चेन्नईवरुन उड्डाण केलेलं विमान गोवा एअर क्लिअरन्स मिळाल्यानंतर चिपी विमानतळावर लँड झालं. या १२ आसनी विमानातून गणपती बाप्पाचं आगमन झालं.

विमानतळासाठी डीजीसीएची परवानगी नसतानाही गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी चिपी विमानतळावर विमान उतरवल्याचा गंभीर आरोप खासदार नारायण राणे यांनी केला . राणे यांच्या टीकेवर केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले असून राणेंच्या पोटात का दुखते, असा प्रतिप्रश्न केला आहे. तसेच विमान कंपनीला दिलेले 10 लाख रुपयांचा चेक कोणाच्या खात्यातून गेला ते राणे यांनी कंपनीलाच विचारावे, असे आव्हानही केसरकर यांनी दिले.