Deepak Kesarkar | मुंबई : प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात बैठक सुरु असल्याचं वृत्त समोर आलं. महाराष्ट्रात पुन्हा भीमशक्ती आणि शिवशक्ती राजकीय पटलावर एकत्र येते का?, या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटातील नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर लावत नव्हते. त्यांना मदतीची गरज आहे. हिंदुत्व सोडलं म्हणून वंचितही गरज आहे, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.
आधी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली. आता वंचितशी सलगी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु, ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर जायचं की, नाही याचा निर्णय वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना घ्यायचा आहे. तो निर्णय़ ते योग्य पद्धतीनं घेतील, असं देखील केसरकर म्हणाले.
दरम्यान, विचाराचा ठेवा महाराष्ट्राच्या पलीकडचा आहे. तो ठेवा जपला गेला पाहिजे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटते, तो ठेवा जपला गेला पाहिजे. त्या भूमिकेबरोबर आम्ही आहोत, असं केसरकर म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “भाजपच्या दबावाला भीक घालणार नाही”, ठाकरे गटातील या नेत्याचा घणाघात
- Sanjay Gaikwad | “प्रसाद लाड पाकिस्तानात जन्मले का? हे तपासावे लागेल”; संजय गायकवाड यांची संतप्त प्रतिक्रिया
- Bacchu Kadu | “एकतर राजा व्हायचं नाही अन् झालं तर…”, बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना टोला
- Ambadas Danve | अन् महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तोंड बंद करुन बसले ; अंबादास दानवेंची टीका
- Shambhuraj Desai | “बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”, शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले