दीक्षाभूमी एक्स्प्रेसने मार्ग बदलला; जालना-औरंगाबादेतील उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय

जालना : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या बरोबर बिहार आदी राज्यांत जाणाऱ्यांसाठी सोयीस्कर असलेल्या दीक्षाभूमी एक्स्प्रेसला बायपास करण्यात आले आहे. परभणी येथून नांदेड अशी ही गाडी वळवण्यात आली आहे. यामुळे ४६४ किमी अंतराचा प्रवास कमी झाला असला तरी जालना आणि औरंगाबाद येथे मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळं जालना रेल्वे संघर्ष समिती ही गाडी पूर्ववत करण्यासाठी बैठक घेणार आहे.

दीक्षाभूमी एक्स्प्रेस कोल्हापूर, कुर्डुवाडी, दौड, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी या मार्गावरून धावत होती. मात्र, दौड मार्गे लातूर, परळी, परभणी अशी धावणार आहे. यापूर्वी या गाडीचा २ हजार ९६८ किमी अंतराचा प्रवास होता यातून ४६४ किमी अंतराचा टप्पा वगळण्यात आला आहे. यामुळे जालना आणि औरंगाबादेतील उत्तर भारतीय कामगारांना मोठा फटका बसला आहे. ही गाडी पुन्हा जुन्या मार्गाने वळवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

लॉकडाऊननंतर दोन दिवसांपूर्वी सुरू झाली एक्सप्रेस
दीक्षाभूमी एक्स्प्रेस लॉकडाऊन झाल्यापासून बंद करण्यात आली होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी ही गाडी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, तिचा मार्ग बदलण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात जवळपास ३० हजारांवर उत्तरभारतीय कामगार नोंदणीकृत आहे. आठवड्यातून एका वेळी जाणाऱ्या गाडीने जालना आणि औरंगाबादमधील हजारो कामगार ये-जा करतात. मात्र, ऐन कामगारांच्या ये-जा काळातच ही गाडी मराठवाडा मार्गावरून बायपास करण्यात आल्याने कामगारांना याचा मोठा फटका बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या