मराठी चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल! देशाच्या समस्त शेतकऱ्यांना ‘अजिंक्य’ होणार समर्पित

मराठी चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल! देशाच्या समस्त शेतकऱ्यांना ‘अजिंक्य’ होणार समर्पित

Bhushan Pradhan And Prarthna Behare

मुंबई : कोरोना काळानंतर चित्रपटगृह सुरु झाले आणि काही चित्रपटंही प्रदर्शित झाले. त्यातील ‘अजिंक्य’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी अर्थात 19 नोव्हेंबर 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. झालेला भूषण प्रधान आणि प्रार्थना बेहरे अभिनित ‘अजिंक्य’ (Anjinkya) या चित्रपटाचे सोशल मीडिया आणि चित्रपट विश्लेषकांकडून कौतुक होताना दिसत आहे. शेतकरी चळवळीसाठी समर्पित होणारा ‘अजिंक्य’ हा पहिलाच मराठी चित्रपट ठरला आहे.

चित्रपटाचे निर्माते अरुणकांत शुक्ला, नीरज आनंद, राघवेंद्र के. बाजपेयी, बाबालाल शेख, राहुल लोंढे, आणि वेद. पी. शर्मा यांनी ‘अजिंक्य’ या चित्रपटात शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यावर तोडगा काढणारा तरुण याची कथा दर्शविण्यात आली आहे. त्यामुळे हा चित्रपट संपूर्णपणे भारतीय शेतकऱ्यांना समर्पित करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता भूषण प्रधान (Bhshan Pradan) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthna Behare) यांनी महत्वाची भूमिका साकारली आहे.

सध्या देशात या विषयी सुरू असणाऱ्या घडामोडी आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या फायद्याच्या सर्वात मोठ्या बाबींवर भाष्य करणाऱ्या ‘अजिंक्य’ या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आयएमडीबी (IMDB) वर अजिंक्य या चित्रपटाला 10 पैकी 10 रेटिंग्ज मिळाले आहेत.

 

चित्रपट हा केवळ मनोरंजनाचा भाग नसून, यातून जनतेचे प्रबोधन व्हावे आणि याच उद्देशाने भारताच्या विविध ठिकाणाहून आलेले आम्ही एकत्र येऊन एका सिनेमासाठी काम करत आहोत. लावलेल्या पैश्याच्या परतफेडीचा विचार न करता एक ज्वलंत विषय लोकांसमोर आणणे आम्हाला महत्वाचे वाटते. हा चित्रपट देशाला जगवणारे अन्नदाते म्हणजेच आपले शेतकरी बंधू यांना समर्पित करण्याची आमची ईच्छा आहे, असं या चित्रपटाचे निर्माते नीरज आनंद (Neeraj Anand) यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या