अहमदनगरमध्ये नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येत घट; काल १० मृत्यूसह ६०० नवे बाधित

corona

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाने हाहाकार घातला आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात ६०० नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४२ हजार ५५९ एवढी झाली असून आत्तापर्यंत ३७ हजार ५३१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८८.१९ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ६९४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात रोज ८०० ते ९०० कोरोना बाधित वाढणारे रुग्ण गेल्या दोन दिवसांपासून रुग्णसंख्या वाढीत घट होत असल्याने काहीसे दिलासादायक चित्र पाहण्यास मिळत आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ७८, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १०७ आणि अँटीजेन चाचणीत ४१५ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३४, अकोले १४, जामखेड १, कर्जत २, नगर ग्रामीण ११, नेवासा ४, पारनेर ३, संगमनेर ५, शेवगाव १, श्रीगोंदे २, श्रीरामपूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ३१, अकोले ३, जामखेड ३, कोपरगाव ५, नगर ग्रामीण ९, नेवासा ४, पारनेर ४, पाथर्डी ५, राहाता १२, राहुरी ९, संगमनेर ४, शेवगाव ६, श्रीरामपूर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा २३, अकोले ४५, जामखेड ३१, कर्जत ३३, कोपरगाव २६, नेवासा ३६, पारनेर २७, पाथर्डी १५, राहाता ५६, राहुरी १२, संगमनेर ४६, शेवगाव १४, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ३० आणि कॅन्टोन्मेंट ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या :-