Share

Diwali 2022 | ‘या’ पद्धती वापरून दिवाळी पूजेचे ताट सजवा

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळी ची Diwali पूजा असो किंवा इतर कोणतेही शुभ काम असो त्यामध्ये पूजेचे ताट हे सर्वात महत्त्वाचे असते. पूजेच्या ताटाला कितीही सजवले तरी आपले मन भरत नाही कारण सजवलेले पूजेचे ताट ही पूजेची शोभा आणि पवित्रता अधिक वाढवते. लोकांचे हे आकर्षण बघता बाजारांमध्ये देखील विविध प्रकारच्या सजवलेले पूजेचे ताट बघायला मिळतात. पण बहुदा लोकांना घरीच सजवलेले पूजेचे ताट आवडते. त्यामध्ये अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा उपयोग करून आपले पूजेचे ताट सजवून त्याला आकर्षक बनवतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही या बातमीच्या माध्यमातून तुम्हाला पूजेचे ताट सजवण्याच्या काही सुंदर आणि सोप्या टिप्स सांगणार आहोत.

दिवाळी पूजेचे ताट सजवण्याच्या सोप्या टिप्स

कवड्या आणि लोकरीचा दोरा

पूजेच्या ताटाला कवड्या आणि लोकरीचा दोरा वापरून खूप छान पद्धतीने सजवता येईल. तुम्ही एखादे इंटरनेटवर डिझाईन शोधून कवड्या आणि लोकरीच्या दोऱ्याच्या मदतीने ते स्वतः ताटावर काढू शकतात. कवड्या आणि लोकरीच्या दोरा एखाद्या विशिष्ट पद्धतीने लावून तुम्ही पूजेचे ताट सजवू शकता. कारण कवड्यांचे आणि लोकरीच्या दोऱ्याचे कॉम्बिनेशन पूजेचे ताटावर खूप छान दिसते.

गोटा आणि आरसे

पूजेचे ताट सजवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या वस्तू उपलब्ध असतात त्यामध्ये प्रामुख्याने गोटा आणि आरशाचा समावेश होतो. कारण गोटा आणि आरशाचे कॉम्बिनेशन खूप आकर्षक दिसते. तुम्ही पूजेच्या ताटाला तुमच्या आवडीचा गोटा आणि आरशाचे वेगवेगळे आकार निवडून फेविकॉल च्या मदतीने ते ताटाला चिटकवून आकर्षक डिझाईन बनवू शकता. किंवा ताटाच्या मध्यभागी तुम्ही छान असे चिटकवून एखादी डिझाईन तयार करू शकता. आरशाचा उपयोग केल्यामुळे ताटात दिवा लावल्यामुळे ते अजून आकर्षक दिसेल.

सिरमॅटिक आणि कुंदन

जर तुमचे रेखाचित्र चांगले असेल तर तुम्ही प्लेटला सिरमॅटिकनेदेखील सजवू शकतात. तुम्ही प्लेटला तुमच्या आवडता रंग देऊन त्यामध्ये कुंदनचा वापर करून सजवू शकतात. त्याचबरोबर तुम्ही ताटाला कुंदनने वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन काढून देखील सजवू शकतात. कुंदन सोबतच तुम्ही फुलं किंवा इतर चमकीदार गोष्टी सुद्धा पूजेचे ताट सजवण्यासाठी वापरू शकतात.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: दिवाळी ची Diwali पूजा असो किंवा इतर कोणतेही शुभ काम असो त्यामध्ये पूजेचे ताट हे सर्वात महत्त्वाचे …

पुढे वाचा

Diwali Artical

Join WhatsApp

Join Now