वापरलेल्या कंडोमच्या कचऱ्याचे विघटन करा; हरित न्याधिकरणाकडे याचिका दाखल

garbage-aurangabad

पुणे : ज्या प्रकारे सॅनिटरी नॅपकिन कचऱ्यामध्ये टाकताना त्याचे वर्गीकरण केले जाते, अशाच प्रकारे कंडोम देखील अविघटनशील गोष्ट असल्याने त्यांच्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येण्याची, मागणी करणारी याचिका हरित न्याधिकरणाकडे दाखल करण्याचे आली आहे. पुण्यातील लॉयर फॉर अर्थ जस्टीस संस्थेकडून ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती ऍड असीम सरोदे यांनी दिली.

देशाचे वर्षाला 100 कोटींच्यावर कंडोमची विक्री केली जाते. या विक्रीचे प्रमाण पाहता एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण होणे गरजेचे आहे. त्यामुळे वापरलेल्या कंडोमला अविघटनशील कचरा जाहीर करावे, त्याचे वर्गीकरण आणि प्रक्रिया करून कंडोमनष्ट करावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

मोदींना भारतातल्या शेतक-यांपेक्षा पाकिस्तानी शेतक-यांची जास्त चिंता !

दूध दरवाढीवर तोडगा नाहीच; पुण्यात दूध कोंडी होण्याची शक्यता