PAN Card- पॅन नंबर मागचं लॉजिक काय?

हल्ली प्रत्येक व्यवहारासाठी पॅनकार्डची आवश्यकता असते. पॅनकार्ड काढणाऱ्या प्रत्येकाला एक पॅन नंबर दिला जातो. प्रत्येकाचा पॅन नंबर हा 10 आकडी असतो. पण तुमच्या मनात कधी आलंय का? हा 10 आकडी पॅन नंबर का असतो. यामागे काय लॉजिक असू शकतं? चला तर जाणून घेऊ 10 आकडी पॅन नंबर मागील लॉजिक…
? पॅन नंबरमध्ये पहिले 3 आकडे हे इंग्रजी मुळाक्षरे असतात. ही मुळाक्षरे AAA टू ZZZ या सिरीजमधील असतात.
? पॅन नंबर मधील चौथे इंग्रजी मुळाक्षर अतिशय महत्त्वाचे असून यातून तुमचे स्टेट्स दर्शवले जाते.
_*स्टेटस काय असते?*_
C म्हणजे कंपनी
P म्हणजे व्यक्ती
H म्हणजे हिंदू संयुक्त कुटुंब
F म्हणजे फर्म
A म्हणजे असोसिएशन ऑफ पर्सन
T म्हणजे ट्रस्ट
B म्हणजे बॉडी ऑफ ईंडीव्हिड्यूअल्स
L म्हणजे लोकल ऑथोरिटी
J म्हणजे आर्टिफिशियल ज्युरीशियल पर्सन
G म्हणजे सरकारी संस्था
? पॅन नंबर मधील पाचवं मुळाक्षर हे पॅनकार्ड धारकाच्या आडनावामधील पहिले मुळाक्षर असते.
? त्यापुढील चार क्रमांक हे 0001 ते 9999 या सिरीजमधील असतात.
? पॅन नंबरचा फॉर्म्युला पूर्ण करण्यासाठी शेवटचे इंग्रजी मुळाक्षर हे चेक डिजिट असते.