नगरमध्ये नविन कोरोना रुग्णसंख्येत घट; रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९३.३९ टक्के!

corona

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- मागील सहा दिवसांपासून नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात ३१६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे.

आता अहमदनगर जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२ हजार १३६ एवढी झाली असून आत्तापर्यंत ४८ हजार ६८८ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात काल ४३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.३९ टक्के इतके झाले आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ७९६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ९१ आणि अँटीजेन चाचणीत १८४ रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ९, कर्जत १, कोपरगाव २, नगर ग्रामीण ७, पारनेर २, पाथर्डी १, राहाता ५, राहुरी २, संगमनेर ५, शेवगाव १, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ३, कॅंटोन्मेंट १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये, मनपा २४, अकोले २२,  जामखेड २, कोपरगाव १, नगर ग्रामीण ६, नेवासे ३, पारनेर ८, पाथर्डी १०, राहुरी १, संगमनेर १, श्रीगोंदे ९, मिलिटरी हॉस्पिटल ४ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर अँटीजेन चाचणीत बाधित आढळुन आलेल्या रुग्णांमध्ये, मनपा १२, अकोले ९, जामखेड १६, कर्जत १०,  कोपरगाव १०, नगर ग्रामीण ७, नेवासे १६, पारनेर ४, पाथर्डी ३५, राहाता २०, राहुरी ७, संगमनेर १३, शेवगाव १२, श्रीगोंदा ५, श्रीरामपूर ८ अशा रुग्णांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या-