कुटुंब नियोजनामुळे देशात हिंदुंच्या संख्येत घट; साध्वी प्रज्ञा सिंह यांनी उधळली मुक्ताफळे

pragya sinh thakur

भोपाळ- भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान केले आहे. कुटुंब नियोजनामुळे देशात हिंदुंच्या संख्येत घट होत असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये छोला दसरा मैदानात विजयादशमी निमित्त आयोजित कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासिंह यांनी हे विधान केले.

यावेळी विरोधी पक्षनेते कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि मेहबुबा मुफ्ती यांच्यावर टीका करतानाच कुटुंब नियोजनाबाबत जनतेला एक सल्लाही साध्वी प्रज्ञा यांनी दिला.हिंदुंनी आपल्या मुलांचं संरक्षण करावं. देवाने तोंड दिलं आहे तर तो घासही देईल. आपण सावध झालो नाही तर आता जे धन कमवत आहात त्याचा उपयोग करण्यासाठी तुमच्या मुलांकडे काही नसेल. इतिहास सांगतो की इतिहासातून सावध राहणं शिकलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या मुलांना राष्ट्रवाद शिकवा असं त्या म्हणाल्या.

आपल्या देशासाठी समर्पित होण्याची भावना त्यांच्या मनामध्ये रुजवा’, असा सल्ला साध्वी प्रज्ञासिंह यांनी हिंदुंना दिला आहे. दरम्यान साध्वी प्रज्ञासिंह यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या