दिलासादायक : राज्याच्या कोरोना पॉझिटिव्हीटी रेट मध्ये घसरण – राजेश टोपे

rajesh tope

जालना : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने थैमान घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशातील स्थिती गंभीर झाली आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण निर्माण झाला आहे. या लाटेतील कोरोना स्ट्रेन हा अधिक धोकादायक असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे.

देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाचे संकट वाढत असले तरी महाराष्ट्राबाबत काहीशी दिलासादायक माहिती समोर येत आहे. गेले काही दिवस साठ हजरांपार असलेला नव्या रुग्णांचा आकडा कमी होत आहे. काल दिवसभरात ४८ हजार ६२१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील महाराष्ट्रातील स्थिती सुधारत असल्याची टिपण्णी केली आहे.

आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधून राज्यातील कोरोना स्थितीवर सविस्तर भाष्य केलं आहे. ‘राज्यात पॉझिटिव्हीटी रेट 27 वरुन 22 टक्क्यांवर आला आहे. महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटतेय मात्र त्याचवेळी दुसरीकडे 24 जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्ग वाढत आहे, असं राजेश टोपे यांनी नमूद केल्यामुळे राज्यातील रुग्ण संख्या जरी घटत असली तरी धोका अजून कायम आहे.

महत्त्वाच्या बातम्या