कर्जबुडव्या मल्ल्या फरार म्हणून घोषित ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

टीम महाराष्ट्र देशा : परदेशात पळून गेलेला घोटाळेबाज विजय मल्ल्या याला विशेष पीएमएलए कोर्टाने फरार म्हणून घोषित केले आहे.ईडीने (सक्त वसुली संचालनालय) त्याला फरार आरोपी म्हणून घोषित करण्याची याचिका दाखल केली होती.त्यावरून माझ्या प्रतिमेला धक्का लागला आहे. त्यामुळं ‘फरारी आरोपी’ हा शब्द काढून टाकावा असं मल्ल्यानेही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून मागणी केली होती.मात्र सुप्रीम कोर्टाने इडीची मागणी मान्य करत मल्ल्याला फरार घोषित केले आहे.

सक्त वसुली संचालनालयाने केलेली मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यामुळे मल्ल्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा इडीचा मार्ग मोकळा झाला आहे. जवळपास 9 हजार कोटींचे बँकाचे कर्ज त्याने बुडवले आहे. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्य आहे.