राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा :देवेंद्र फडणवीस

devendra fadanvis

पटना:राज्यातील ज्या भागात प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाली असेलत्या संबंधित भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तेथे ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे.या पत्रात ते म्हणतात ‘ परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून थेट मदत मिळणं गरजेचं आहे.

तसेच गेल्या ३ ते ४ दिवसांत पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. तो मदतीसाछी आर्जव करत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून वेदना होतात. पण राज्य सरकारला अजूनही पाझर फूटत नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत यापलीकडे सरकारकडून काहीही शब्द दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामे देखील होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. आज अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या बातम्या-