हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा – इल्यासी

maharashtra cow

अहमदाबाद : हिंदुंमध्ये पवित्र मानल्या जाणा-या गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करा, अशी मागणी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायजेशन (एआयआयओ) चे प्रमुख उमर अहमद इल्यासी यांनी आज येथे केले. गुजरात विद्यापीठामध्ये आयोजित ‘षष्ट्ब्दीपूर्ती महोत्सवात’ ते बोलत होते.

यावेळी येथील अनेक जणांनी इल्यासी यांचे समर्थन केले.  यावेळी त्यांनी दोन वर्षापूर्वी घडलेला प्रसंग येथील उपस्थितांना सांगितले. ते म्हणाले की,  दिल्लीत जैन आणि मुस्लिम कुटुंब एकमेकांच्या शेजारी राहत होते. बकरी ईदच्या दिवशी मुस्लिम कुटुंब बकरीची कुर्बानी देत असल्याने जैन कुटुंबीय दहा दिवस घर सोडून जायचे. मला याबाबत कळताच मी मुस्लिम कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना मानव धर्माबाबत समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी बकरी ईदीच्या दिवशी बाहेर जाऊन कुर्बानी द्यायला सुरूवात केली, असे त्यांनी सांगितले.