ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलनाच्या सीमा ओलांडू; रविकांत तुपकर यांचा इशारा

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलनाच्या सीमा ओलांडू; रविकांत तुपकर यांचा इशारा

Ravikant Tupkar

बुलडाणा : गेल्या महिन्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने आणि ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले. शेती खरडून गेल्या, शेत जमिनीला तलावाचे स्वरूप आले, आणि पुन्हा राज्यात १६ आणि १७ ऑक्टोंबर रोजी आतिवृष्टी झालीय. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा स्वाभिमानी शेकरी संघटना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

केंद्र सरकार असो वा राज्य सरकार,  दोघांनीही शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे टाकण्याची आवश्यकता आहे. अतिवृष्टीमुळे शेतात राहिलेले थोडेफार पीक सुद्धा वाया गेले आहे. शेतकरी आता संकटांना तोंड देतांना पुरता हताश झालाय. त्यामुळे येत्या ३ दिवसांत राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून कोणतेही निकष न लावता सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी, अशी मागणी तुपकर यांनी केली आहे.

राज्य सरकारच्या वतीने घोषणा करण्यात आलेली रक्कम अत्यंत तोकडी आहे. शेतकऱ्यांचे नुकसान पाहता, जास्तीत जास्त मदत करण्याची आवश्यकता असल्याचे तुपकर यांनी म्हटले आहे. सरकारने या संदर्भात निर्णय घेतला नाही तर, स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या सर्व परिसीमा पार करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या